शिवाजी महाराज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:12+5:302021-04-01T04:18:12+5:30
‘एमआरपीनुसारच खते खरेदी करा’ पाथरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खतांची खरेदी करताना बॅगवरील एमआरपी पाहूनच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा ...

शिवाजी महाराज यांना अभिवादन
‘एमआरपीनुसारच खते खरेदी करा’
पाथरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खतांची खरेदी करताना बॅगवरील एमआरपी पाहूनच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती मीराताई टेंगसे यांनी केले आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांनी जुन्या दरात खरेदी करून साठा केला आहे. काही व्यापारी १ एप्रिलपासून खताच्या किमती वाढणार असल्याचेही त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
ऑनलाइन वीजबिल भरण्यास प्रतिसाद
परभणी : जिल्ह्यातील लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलाचा भरणा करण्याची ऑनलाइन सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पर्यायाला जिल्ह्यातील ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी
परभणी : तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या साडेतीन किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू आहे. मात्र मागील वर्षापासून हे काम रखडले आहे. त्यामुळे आशीर्वाद कन्स्ट्रक्शनने हे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
वाळू उपसा रोखण्याची मागणी
गंगाखेड : तालुक्यातील आनंदवाडी, दुसलगाव, मैराळ सावंगी आदी गावांतील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. हा वाळू उपसा तत्काळ बंद करावा, अशी मागणी नदीकाठावरील ग्रामस्थांमधून होत आहे.
परभणी शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
परभणी : शहरातील साखला प्लॉट, शांतिनिकेतन कॉलनी यासह इतरही भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, बिनदिक्कतपणे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याकडे जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या डॉक्टरांकडून होणारा उपचार रुग्णांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
आर्थिक मदत देण्याची मागणी
परभणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे कामगार, मजूर व कलावंत तसेच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
विनापरवाना दारू वाहतूक वाढली
सेलू : तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री करण्याच्या उद्देशाने होणारी विनापरवाना दारू वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांना रान मोकळे आहे.