परभणीत देखाव्यातून बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:22 AM2018-04-15T00:22:57+5:302018-04-15T00:22:57+5:30

सर्वधर्मीय फुले, शाहु, आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ‘देई आत्मसन्मान... भारतीय संविधान’ हा विचारवेधक देखावा सादर करुन आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले.

Greetings to Babasaheb from Parbhani's scene | परभणीत देखाव्यातून बाबासाहेबांना अभिवादन

परभणीत देखाव्यातून बाबासाहेबांना अभिवादन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सर्वधर्मीय फुले, शाहु, आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ‘देई आत्मसन्मान... भारतीय संविधान’ हा विचारवेधक देखावा सादर करुन आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले.
तथागत भगवान गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा फुले, लोकराजा शाहू महाराज यांच्या वैचारिक चळवळीतून उदयास आलेल्या सामान्य माणसांचा आत्मसन्मान अधोरेखीत करण्यात आला. भारतीय संविधानाने महापुरुषांच्या क्रांती विचारांचे सारसूत्र स्वीकारल्याचा संदेश देखाव्यातून देण्यात आला.
उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.तुकाराम साठे, अ‍ॅड.प्रताप बांगर, एन.आय. काळे, निमंत्रक यशवंत मकरंद, प्रा.अनंत शिंदे, सुनील जाधव, निवृत्ती रेखडगेवार, त्र्यंबक वडसकर, प्रा.राजकुमार मनवर, दीपक पंचागे, समीर रोडे, सुनील ढवळे, रवि पंडित, मिमोह अढागळे, शाहीर नामदेव लहाडे आदींची यावेळी उपस्थिती होती. या देखाव्याची निर्मिती डी.जे.खंदारे व राजेश कापुरे यांनी केली. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित बुद्धाची शपथ या पुस्तकाचे प्रकाशन सारनाथ सौंदडकर, प्रेमानंद बनसोडे, किरण कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Greetings to Babasaheb from Parbhani's scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.