आयशरच्या धडकेत आजी-नातीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 21:01 IST2023-11-01T21:01:32+5:302023-11-01T21:01:38+5:30
पोलीसांनी आयशर ताब्यात घेतला आहे.

आयशरच्या धडकेत आजी-नातीचा मृत्यू
सोनपेठ( परभणी): शेतातुन घरी परतणाऱ्या बैलगाडीस आयशर टेंम्पोने दिलेल्या धडकेत बैलगाडीतील आजी नातीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोनपेठ शहरात घडली.
मंगळवार (ता.१) रोजी सायंकाळच्या सुमारास सोनपेठ शहरातील मोंढा परीसरात शेळगाव रोडवर शेताकडुन घरी परतणाऱ्या बैलगाडीस मागुन येणाऱ्या आयशर टेंम्पोने जोरदार धडक दिल्याने बैलगाडीतील राधाबाई बालासाहेब वाकडे (वय ४५ रा. दहिखेड) व त्यांची नात आराध्या अमोल कापसे (वय ९ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातात बैलगाडीतील उषाबाई व्यंकटी आवाड या गंभीर जखमी झाल्या असुन त्यांना अधिक उपचारासाठी अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर आविष्कार अमोल कापसे, राजमाती दत्ता भंडारे, दत्ता भंडारे हे किरकोळ जखमी झालेल्या तीघा जणावार सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ऐन वर्दळीच्या वेळेस सोनपेठ शहरात झालेल्या या अपघातामुळे नागरीकांनी मोठी गर्दी केली होती . पोलीसांनी आयशर ताब्यात घेतला आहे.