अवैध दारू विक्री बंदसाठी ग्रा. पं.ने घेतला ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:18+5:302021-05-25T04:20:18+5:30
मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील रामपुरी बु. येथे अवैध दारू विक्रीने कळस गाठला असून गावातील तरुणपिढी व्यसनाधीन झाल्याचे चित्र आहे. ...

अवैध दारू विक्री बंदसाठी ग्रा. पं.ने घेतला ठराव
मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील रामपुरी बु. येथे अवैध दारू विक्रीने कळस गाठला असून गावातील तरुणपिढी व्यसनाधीन झाल्याचे चित्र आहे. तसेच अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने गावातील येनूबाई पांचाळ, लता अंभोरे, मंगल अंभोरे, कुसूबाई यादव, कोंडाबाई तलवारे, छाया धबडगे, वानरसी काळे, लक्ष्मीबाई सोनवणे, कमल विष्णू तलावरे, धुरपतबाई लोखंडे, गायबई सोरेकर, कमल सपाटे, जिजाबाई कसाब यांच्यासह ४० महिलांनी ८ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. त्यानंतर गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. १७ मे रोजी सरपंच जयश्री साठे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत उपसरपंच प्रतिमा विशाल यादव यांनी महिलांच्या मागणीप्रमाणे दारू विक्री बंद करण्यात यावी, असा विषय मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठराव मंजूर झाल्यानंतर १९ मे रोजी ठरवाची प्रत पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांना देऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे.