परभणीतील फरार कोरोनाबाधित कैदी बिअरबारमधून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:35 IST2020-09-04T15:33:13+5:302020-09-04T15:35:27+5:30
१ सप्टेंबरच्या पहाटे तीन कोरोनाबाधित कैद्याने शौचालयाचे गज कापून रूग्णालयातून पलायन केले होते.

परभणीतील फरार कोरोनाबाधित कैदी बिअरबारमधून जेरबंद
सेलू : परभणी येथील जिल्हा रूग्णालयातून उपचारादरम्यान फरार झालेल्या एका कोरोनाबाधित कैद्यास सेलू पोलीसांनी शुक्रवारी दुपारी १. १५ वाजता शहरातील एका बिअर बारमधून जेरबंद केले. १ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान पळून गेलेल्या तीनही कैद्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात परभणी पोलीसांनी यश आले आहे.
परभणी जिल्हा कारागृहात विविध गुन्हयात सजा भोगसत असलेल्या ८४ कैदांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात या कैदांवर कोरोना वार्डात उपचार सुरू दाखल करून उपचार सुरू होते. एका वार्डात १६ कैदी उपचार घेत होते. १ सप्टेंबरच्या पहाटे तीन कोरोनाबाधित कैद्याने शौचालयाचे गज कापून रूग्णालयातून पलायन केले होते. यातील दोन खुनाच्या तर एकजण गांजा प्रकरणातील कैदी होता. यातील एक खुनातील व गांजाच्या गुन्ह्यातील एका कैद्यास अटक केली होती.
यातील तिसरा फरार कैदी सेलू येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग कोडतीर्थवाले, पोलीस कर्मचारी श्रीहरी मुंडे, विलास सातपुते, राजू पिंपळे, ज्ञानेश्वर पौळ यांनी सापळा रचून फरार झालेला ६० वर्षीय कोरोनाबाधित कैद्यास शहरातील एका बीअरबारमधून अटक केली.