जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:39 AM2021-09-02T04:39:20+5:302021-09-02T04:39:20+5:30

परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण व नातेवाईक उपचारासाठी येतात. मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला ...

Follow the rules at the district hospital itself; How to stop the third wave of corona? | जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

googlenewsNext

परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण व नातेवाईक उपचारासाठी येतात. मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. डेंगू, मलेरिया यासारख्या आजाराचे रुग्ण हजारोच्या संख्येने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे बुधवारी दिसून आले. विशेष म्हणजे या रुग्ण व नातेवाईकांकडून सोशल डिस्टन्स, मास्क वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे असतानाही रुग्णालय प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे एकीकडे तिसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात असताना दुसरीकडे मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखणार कसे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ओपीडी हाऊसफुल

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे सर्दी, ताप, डोके, हात पाय दुखणे, अशक्तपणा येणे यासह आदी आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालया बरोबरच शासकीय रुग्णालयात मोठ्याप्रमाणात उपचारासाठी रुग्ण येत आहेत. बुधवारी केलेल्या पाहणीत जिल्हा सामान्य रुग्णालयाची ओपीडी हाऊस फुल असल्याचे दिसून आले.

डेंगू, मलेरियाचे रुग्ण वाढले

परभणी शहरासह जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून डेंगू, मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बुधवारी केलेल्या पाहणीत खाजगी रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वाधिक डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण उपचार घेताना दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

रुग्णालयात सुपर स्पेडर ठरू नये....

वातावरणात झालेल्या बदलामुळे मागील काही दिवसापासून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येताना मास्क, सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझर चा कोणताही वापर न करता सरळ उपचार घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात होणारी गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी मधून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Follow the rules at the district hospital itself; How to stop the third wave of corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.