शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

परभणी जिल्ह्यात पाच दिवसांत झाला ६८ दलघमीचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:35 IST

 मागील आठवड्यात झालेला पाऊस प्रकल्पांसाठी समाधानकारक ठरला

परभणी:  मागील आठवड्यात झालेला पाऊस प्रकल्पांसाठी समाधानकारक ठरला असून जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये पाच दिवसांमध्ये तब्बल ६८.६७४ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. पाच दिवसांपूर्वीच्या पाणीसाठ्यामध्ये १४.६९ टक्क्यांनी वाढ झाल्याने हा पाऊस प्रकल्पांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.

जिल्ह्यात येलदरी, निम्न दुधनासह मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. २३ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली होती. प्रकल्पही कोरडे होते; परंतु, पिकांसाठीच पाणी नाही तर प्रकल्पांची चिंता दूरची असल्याने शेतकरी पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा करीत होते. स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर १९ व २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिके तगली. त्याच जोडीला प्रकल्पांचा पाणीसाठाही वाढला आहे. 

१८ आॅगस्ट रोजी येलदरी प्रकल्पामध्ये १६.६५२ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. २३ आॅगस्ट रोजी या प्रकल्पात ५२.२१४ दलघमी उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्याची टक्केवारी ६.४५ एवढी आहे. निम्न दुधना प्रकल्पात १८ आॅगस्ट रोजी ५१.९८० दलघमी जलसाठा उपलब्ध होता. आता हा जलसाठा ६५.९८० दलघमीवर गेला आहे. मासोळी प्रकल्प १८ आॅगस्ट रोजी कोरडाठाक होता. या प्रकल्पात सध्या १.१२० दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. डिग्रस बंधाऱ्यात ३९.७९० दलघमी पाणी १८ आॅगस्ट रोजी उपलब्ध होते. सध्या या बंधाऱ्यात ४१.६६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मुद्गल आणि ढालेगावचे बंधारे तर या काळात ओव्हरफ्लो झाले.  १८ आॅगस्टनंतर जिल्ह्यात सलग दोन दिवस सरासरी ५० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. या दोन-तीन दिवसांच्या पावसाळ्यामुळे प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नसून अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

मुद्गल बंधाऱ्याला सर्वाधिक लाभ१८ आॅगस्ट रोजी पाथरी तालुक्यातील मुद्गल बंधाऱ्यामध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. २.५८० दलघमी पाणीसाठा या प्रकल्पामध्ये पावसापूर्वी होता. २३ आॅगस्ट रोजी प्रकल्पाच्या घेतलेल्या नोंदीनुसार सध्या या प्रकल्पात ११.३६० दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला असून हा प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरला आहे. पाच दिवसांच्या या काळात प्रकल्पामध्ये ८.८ दलघमीची वाढ झाली असून ७७ टक्के पाणीसाठा या काळात उपलब्ध झाला आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पामध्ये हा पाऊस समाधानकारक ठरला. या प्रकल्पामध्ये ८.२७९ दलघमी (३३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या प्रकल्पात १४.२६० दलघमी (५७ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. 

मुळीची मात्र उलटी गंगाजिल्ह्यातील इतर प्रकल्प आणि बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असताना गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्यात मात्र पाऊस झाल्यानंतरच्या काळात बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला आहे. १८ आॅगस्ट रोजी मुळी येथील बंधाऱ्यात १.२१७ दलघमी (१२.१० टक्के) जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. २३ आॅगस्ट रोजी या बंधाऱ्यात ०.९४६ दलघमी (९.४१ टक्के)पाणीसाठा शिल्लक आहे. ५ दिवसांमध्ये जमा झालेले ०.२७१ दलघमी पाणी वाहून गेले आहे. या बंधाऱ्याच्या गेटचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठाच होत नाही.

५ दिवसांत जमा झालेले पाणी

प्रकल्प    दलघमी    टक्केवारीयेलदरी    ३५.५६२    ४.४दुधना     १३.९१    ४.५करपरा    ५.९९    २४मासोळी    १.१२    ४ डिग्रस     १.८७    २.९७मुद्गल    ८.८    ७७.४३ढालेगाव    १.४९    २०पिंपळदरी    ०.०१    ०.२३एकूण       ६८.६७    १४.६९

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पparabhaniपरभणी