आधी वडील आता आईचे अपघाती निधन; विजेचा धक्का बसून महिलेच्या मृत्यूने ३ मुली पोरक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:39 IST2021-06-03T18:39:18+5:302021-06-03T18:39:39+5:30
तालुक्यातील नागरजवळा येथे दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

आधी वडील आता आईचे अपघाती निधन; विजेचा धक्का बसून महिलेच्या मृत्यूने ३ मुली पोरक्या
मानवत : तालुक्यातील नागरजवळा या गावातील ३१ वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. सागर अंगद होंगे असे मृत महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याच्या पतीचे निधन झाले होते. यामुळे आता त्यांच्या तीन मुली पोरक्या झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नागरजवळा येथे दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. आज विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थ खोळांबलेली कामे करत होती. सागर अंगद होंगे यापाण्याचा टाकीचा वॉल फिरवण्यासाठी छतावर गेल्या होत्या. यावेळी घरावरील पत्रांवर साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाहाचा धक्का त्यांना बसला. यात त्या जागीच ठार झाल्या. सपोउनि अशोक ताटे व नीलेश परसोडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
तीन मुली झाल्या अनाथ
सागर यांचे पती अंगद होंगे यांचे २ वर्षांपूर्वी मानवत येथे अपघाती निधन झाले होते. त्यांना तीन मुली आहेत. सागर यांच्या अपघाती निधनाने आता तिन्ही मुलीच्या डोक्यावरील मायेचे छत्र देखील हरवले आहे.