शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

गंगाखेड नगर परिषदेच्या लेखा विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:41 PM

नगर परिषद कार्यालयातील लेखा विभागाला काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

गंगाखेड (परभणी ) : नगर परिषद कार्यालयातील लेखा विभागाला काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या इमारतीत मुक्कामी थांबलेल्या वारकऱ्यांच्या लक्षात हि बाब आल्याने पुढील अनर्थ टळला.

नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीत गुरुवारी (दि. ५ ) रात्री शेगाव ते पंढरपुर कडे जाणारी श्री गजानन महाराज यांची पालखी मुक्कामी थांबली होती. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास लेखा विभाग कक्षाला आग लागल्याचे बांधकाम विभाग कक्षात झोपलेल्या वारकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने इमारती बाहेर धाव घेऊन वॉचमनला याची माहिती दिली. त्याचवेळी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलात कार्यरत कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. 

आग लागल्याचे समजताच मुख्याधिकारी नानासाहेब कामटे, कार्यालयीन अधीक्षक भगवान बोडखे, स्वछता निरीक्षक वसंतराव वाडकर, विलास तातोडे, शेख गफार, रामविलास खंडेलवाल, स्विकृत सदस्य दिपक तापडिया यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तब्बल १ तासानंतर आग आटोक्यात आली. 

महत्वाची कागदपत्रे सुरक्षित आगीत तीन कपाटापैकी एका कपाटाला मोठी झळ पोहचली. यात  कपाटावर ठेवलेले कागदपत्रे, दोन संगणक संच, झेरॉक्स मशीन, प्रिंटर आदी जळुन खाक झाले. याच कक्षात असलेले इन्व्हर्टर तसेच बॅटरी तातडीने बाहेर काढण्यात आली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. महत्वाची सर्वच कागदपत्रे सुरक्षित असल्याचे नगर परिषद प्रशासनाने सांगितले आहे.

टॅग्स :fireआगparabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिका