दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:21 IST2021-08-22T04:21:51+5:302021-08-22T04:21:51+5:30
परभणी तालुक्यातील मांडाखळी येथील चिताडे यांच्या शेतातील सालगडी विष्णू रामराव जाधव हे १७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ...

दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
परभणी तालुक्यातील मांडाखळी येथील चिताडे यांच्या शेतातील सालगडी विष्णू रामराव जाधव हे १७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास मांडाखळी येथील शेतातील आखाड्यावरून एमएच २२ ए ४१६ क्रमांकाच्या दुचाकीवरून परतत असताना पाळोदी रोडवर एमएच २६ एएक्स ३५५३ क्रमांकाच्या दुचाकीसोबत जाधव यांच्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारार्थ त्यांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नांदेड येथे हलविण्यात आले. तेथे एका खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना विष्णू रामराव जाधव यांचा मृत्यू झाला. याबाबत मृताच्या पत्नी आशाबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमएच २६ एएक्स ३५५३ क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरोधात १९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.