चाकूचा धाक दाखवून पावणे तीन लाखांचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:52+5:302021-04-05T04:15:52+5:30
गंगाखेड शहरातील एका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस राहत असलेल्या मुक्ताबाई काशीनाथ गायकवाड (६५) यांच्या घरी त्यांची मैत्रीण सुनीता देवराव पवार ...

चाकूचा धाक दाखवून पावणे तीन लाखांचे दागिने पळविले
गंगाखेड शहरातील एका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस राहत असलेल्या मुक्ताबाई काशीनाथ गायकवाड (६५) यांच्या घरी त्यांची मैत्रीण सुनीता देवराव पवार ही ३० मार्च रोजी आली होती. दोघींच्या गप्पा झाल्यानंतर ६.३० च्या सुमारास मुक्ताबाई या स्वयंपाक करीत असताना तोंडाला रुमाल बांधून ३ तरुण घरात आले. या तरुणांना त्यांची मैत्रीण सुनीता पवार यांनी चॅनल गेट उघडून घरात प्रवेश दिला. ३ पैकी एकाने घराबाहेर थांबून शिवीगाळ सुरू केली, तर दोघांनी आत जाऊन मुक्ताबाई यांना चाकूचा धाक दाखवून घरातील बांगड्या, सोन्याची पोत, झुंबर, कानातील वेल असे एकूण २ लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेऊन दुचाकीवरून पोबारा केला. मैत्रीण सुनीता पवार हिच्या मदतीनेच चोरट्याने ही लूट केल्याच्या संशयावरून मुक्ताबाई गायकवाड यांनी गंगाखेड पेालीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.