शेतकऱ्यांचा हरभरा शासकीय केंद्रावर खरेदी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:04+5:302021-02-06T04:30:04+5:30
पालम तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांनी कापूस पिक मोडून हरभरा पेरला होता. ...

शेतकऱ्यांचा हरभरा शासकीय केंद्रावर खरेदी करावा
पालम तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांनी कापूस पिक मोडून हरभरा पेरला होता. त्यामुळे हरभरा उत्पादन वाढले आहे. मात्र पालम शहरात हरभरा खरेदीसाठी शासनाचे हमी भाव केंद्र कार्यरत नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कवडीमोल दराने व्यापारी हरभरा खरेदी करीत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. शासनाने गंगाखेड येथे हरभरा खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी पालम तालुक्यातील हरभरा खरेदी केली जात नाही. तातडीने याची दखल घेऊन गंगाखेड येथील खरेदी केंद्रावर पालम तालुक्यातील हरभरा खरेदी साठी नियोजन करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे. या निवेदनावर बंडू जाधव, माजी जिल्हा परिषद सभापती चित्राताई दुधाटे, कृउबा उपसभापती तुषार गोळेगावकर, मुख्तार पठाण, सिताराम पौळ आदींच्या सह्या आहेत.