शेतकऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरणात गंगाखेड शुगरच्या मुख्य शेतकी अधिकाऱ्यांसह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 16:29 IST2019-02-20T16:28:42+5:302019-02-20T16:29:46+5:30
या गुन्ह्याचा तपास औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरणात गंगाखेड शुगरच्या मुख्य शेतकी अधिकाऱ्यांसह दोघांना अटक
गंगाखेड (परभणी) : बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरणात औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गंगाखेड शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी, ऊस पुरवठा अधिकारी व ऊस विकास अधिकारी अशा तिघांना आज सकाळी अटक केली.
राज्यभर गाजलेल्या गंगाखेड शुगरच्या शेतकरी कर्ज प्रकरणात गंगाखेड पोलीस ठाण्यात २०१७ साली कलम ४०६, ४०९, ४१७, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० ब, ३४ भादवीने गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. विभागाच्या पोलीस अधीक्षक लता फड, उपअधीक्षक पठाण यांच्या पथकाने आज सकाळी गंगाखेड शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार रतनलाल शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास मारुती अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग महादु पडवळ अशा तिघांना अटक केली. या कारवाईने कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.