पाथरीत अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 19:38 IST2021-05-18T19:37:46+5:302021-05-18T19:38:06+5:30

पाथरी परिसरात १८ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

The farmer was struck by lightning and killed on the spot | पाथरीत अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार

पाथरीत अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार

ठळक मुद्देपाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील घटना

पाथरी (जि. परभणी): पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारात अचानक झालेल्या पावसात शेतात काम करणाऱ्या कैलास भारत टेकाळे (३५) या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

पाथरी परिसरात १८ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी १५ मिनिटे वादळी वारे सुटले होते. या काळात देवनांद्रा शिवारात वीज कोसळली. देवनांद्रा येथील कैलास भारत टेकाळे हे शेतात काम करत असताना, वारे सुटल्याने ते शेतातील लिंबाच्या झाडाकडे जात असतानाच त्यांच्या अंगावर वीज पडली व ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, असा परिवार आहे. घटनेनंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
 

Web Title: The farmer was struck by lightning and killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.