पेरणीस पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:15 IST2018-05-31T19:15:11+5:302018-05-31T19:15:11+5:30
पेरणीचे दिवस असताना जवळ पुरेसे पैसे नसल्याने नैराश्यातून देवलगाव येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

पेरणीस पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
मानवत (परभणी ) : पेरणीचे दिवस असताना जवळ पुरेसे पैसे नसल्याने नैराश्यातून देवलगाव येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली. इंद्रजीत अवचार असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर खाजगी सावकाराचे कर्जसुद्धा होते.
देवलगाव येथील इंद्रजीत अवचार यांची गावात शेती आहे. त्यांच्यावर खाजगी सावकाराचे कर्ज आहे. पावसाची चाहूल लागल्यानंतर आता पेरणीचे दिवस तोंडावर आहेत. यातच पेरणीसाठी लागणारे पैसे नसल्याने नैराश्यातून अवचार यांनी त्यांच्या शेतात जाऊन झाडास गळफास घेतला. केशव अवचार यांच्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास बीट जमादार सावंत करत आहेत.