खळबळजनक ! ओव्हरटेक केल्याच्या रागातून दोघा भावांना चाकूने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 15:16 IST2021-01-21T15:15:01+5:302021-01-21T15:16:16+5:30
Crime News खळबळजनक घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रायगड कॉर्नर येथे घडली.

खळबळजनक ! ओव्हरटेक केल्याच्या रागातून दोघा भावांना चाकूने भोसकले
सेलू :- रस्त्यावर ओव्हरटेक केल्याच्या रागातून दोन सख्या भावांना चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रायगड कॉर्नर येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात सेलू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा पांचाळ आणि गोविंद पांचाळ हे दोघे रायगड कॉर्नर येथे दुचाकीवरून जात होते. यावेळी पाठीमागून आलेले विजय वाघ, हनुमान वाघ, संजय वाघ, अमोल वाघ, सारंग वाघ ओव्हरटेक का केले असे विचरात पांचाळ बंधूंसोबत वाद घातला. यानंतर त्यांनी दोघांवर चाकूने वार केले. दोघांच्या छाती आणि पोटावर चाकूने गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर परभणी येथील खाजगी रूगणालयात उपचार सुरु आहेत. कृष्णा पांचाळ यांच्या फिर्यादीवरुन विजय वाघ, हनुमान वाघ, संजय वाघ, अमोल वाघ, सारंग वाघ यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय वाघ याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे करत आहेत.