Events in Parbhani; Just smash the glass with a stone | परभणीतील घटना; दगड मारून बसची फोडली काच

परभणीतील घटना; दगड मारून बसची फोडली काच

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मांडाखळी येथून परभणी बसस्थानकाकडे जाणाऱ्या बसवर दगड मारुन बसची काच फोडल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता गंगाखेड रोडवरील अनुसया टॉकीजच्या समोर घडली.
परभणी आगाराची बस (क्र.एम.एच.०६/एस ८७७७) शनिवारी इंद्रयणी देवीच्या माळावरुन प्रवाशांना घेऊन बसस्थानकाकडे येत असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गंगाखेड रस्त्यावरील अनुसया चित्रमंदिराच्या समोर एका अज्ञात व्यक्तीने बस थांबवली आणि काचेवर दगड मारुन पळून गेला. यामध्ये बसचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
या प्रकरणी बसचालक संजय गुणाजी देमे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत व्यंकटकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, हा प्रकार कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही़

Web Title: Events in Parbhani; Just smash the glass with a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.