कोरोनाचा उद्रेक; २७० नव्या रुग्णांची भर, पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST2021-03-24T04:15:49+5:302021-03-24T04:15:49+5:30
मागच्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूचे सुरू झालेले सत्रही थांबत नसल्याने चिंताजनक स्थिती ...

कोरोनाचा उद्रेक; २७० नव्या रुग्णांची भर, पाच जणांचा मृत्यू
मागच्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूचे सुरू झालेले सत्रही थांबत नसल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी १ हजार ३१९ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ८५९ अहवालांमध्ये १५५ तर रॅपिड टेस्टच्या ४६० अहवालांमध्ये ११५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूचे सत्रही थांबेना. मंगळवारी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ३ पुरुष, १ महिला आणि खासगी रुग्णालयातील एक पुरुष अशा ५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण ११ हजार २८१ रुग्णसंख्या झाली आहे. त्यातील ९ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३५८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, १ हजार २३ रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांमध्ये ३०३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ७०१ झाली आहे.
परभणी तालुक्यातील १५९ रुग्ण
परभणी तालुक्यातच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तालुक्यात १५९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, जिंतूर तालुक्यात २३, पूर्णा २४, गंगाखेड १४, सेलू १९, मानवत ८, पालम ५, सोनपेठ ३ आणि पाथरी तालुक्यात एका रुग्णाची नोंद झाली. त्याचप्रमाणे मालेगाव, नांदेड, हिंगोली येथील एकूण ८ रुग्ण परभणी जिल्ह्यात पॉझिटिव्ह झाले आहेत.