कोरोनाच्या ११ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:26+5:302021-04-02T04:17:26+5:30

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची धडधड वाढली आहे. आतापर्यंतच्या संसर्ग काळातील मृत्यूचे हे ...

Eleven corona patients died | कोरोनाच्या ११ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या ११ रुग्णांचा मृत्यू

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची धडधड वाढली आहे. आतापर्यंतच्या संसर्ग काळातील मृत्यूचे हे प्रमाण सर्वाधिक ठरले आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यात दररोज २०० ते ३०० रुग्णांची नोंद होत असून, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अडीच हजारांवर पोहोचली आहे. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. मागील आठवडाभरापासून दररोज रुग्ण दगावत आहेत. गुरुवारी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५ पुरुष, ५ महिला आणि खासगी रुग्णालयातील एक पुरुष अशा एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ४२३ झाली आहे.

आरोग्य विभागाला गुरुवारी २ हजार ३५६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ७९८ अहवालांमध्ये २२१ आणि रॅपिड टेस्टच्या ५५८ अहवालांमधून १७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. एकूण ४०० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आता एकूण १४ हजार ८५७ रुग्ण संख्या झाली आहे. त्यातील ११ हजार ८९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या २ हजार ५३५ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १२९ रुग्ण उपचार घेत असून, खासगी रुग्णालयात २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ हजार १०९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: Eleven corona patients died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.