अकरा कोरोना केअर सेंटर्स रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:14 AM2021-06-04T04:14:56+5:302021-06-04T04:14:56+5:30

परभणी : जिल्ह्यात २ हजार १०५ उपचाराधीन रुग्ण असले तरी कोरोना रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटरमध्ये केवळ ३३२ ...

Eleven Corona Care Centers empty | अकरा कोरोना केअर सेंटर्स रिकामे

अकरा कोरोना केअर सेंटर्स रिकामे

Next

परभणी : जिल्ह्यात २ हजार १०५ उपचाराधीन रुग्ण असले तरी कोरोना रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटरमध्ये केवळ ३३२ रुग्ण उपचार घेत असून, रुग्णांअभावी २४ पैकी ११ कोरोना केअर सेंटर्स बंद आहेत.

कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात घटला असून, रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर्स रुग्णांअभावी ओस पडत आहेत. शहरी भागातील कोरोना रुग्णालयांव्यतिरिक्त तालुक्याच्या ठिकाणी प्रशासनाने कोरोना केअर सेंटर सुरू केले होते. कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर या सेंटर्समध्ये उपचार केले जात आहेत. एकूण २४ कोरोना केअर सेंटरपैकी ११ सेंटरमधील खाटा रिक्त आहेत. कोरोना केअर सेंटरमध्ये २ हजार ३९० खाटा उपलब्ध असून, केवळ ९९ रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यामुळे २ हजार २९१ खाटा रिकाम्या आहेत. कोरोना रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर्समध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अवघी ३३२ असून दोन्ही ठिकाणच्या मिळून ३ हजार ६२९ खाटा रिक्त आहेत. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग घटल्याचे दिसून येत आहे. संस्थात्मक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

ऑक्सिजनच्या ९१० खाटा रिक्त

बाधित रुग्णांना ऑक्सिजन लागण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. अतिदक्षता विभागात ५३३ आणि अतिदक्षता विभागवगळता ५५४ अशा १ हजार ८७ ऑक्सिजन खाटा रुग्णांसाठी सज्ज ठेवल्या आहेत. अतिदक्षता विभागात ६९ रुग्ण ऑक्सिजन खाटांवर तर १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत तर अतिदक्षता विभागवगळता इतर ठिकाणी ८९ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५८ आहे.

Web Title: Eleven Corona Care Centers empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.