शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

परभणी जिल्ह्यात ३२०० हेक्टरवर झाली उन्हाळी हंगामात पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:47 IST

२०१७-१८ च्या उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ३ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयावर्षी जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांसह नदी-नाल्यांना बर्‍यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. या सर्वांचा विचार करून कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील उन्हाळी हंगामासाठी ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. मध्ये भूईमूग या पिकासाठी ४ हजार ८१०, सूर्यफूलासाठी ४३० व मकासाठी २८० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. 

परभणी : २०१७-१८ च्या उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ३ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक २ हजार ९७६ हेक्टरवर भूईमुगाची तर २९६ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी रबी हंगामामध्ये सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांकडून पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई ंआदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये परतीचा  पाऊस समाधानकारक झाल्याने रबी हंगामातील पिकेही बहरली आहेत. त्यातून शेतकर्‍यांना जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगले उत्पन्नही मिळत आहे. 

यावर्षी जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांसह नदी-नाल्यांना बर्‍यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. या सर्वांचा विचार करून कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील उन्हाळी हंगामासाठी ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यामध्ये भूईमूग या पिकासाठी ४ हजार ८१०, सूर्यफूलासाठी ४३० व मकासाठी २८० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.  यापैकी २२ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ९७६ हेक्टर क्षेत्रावर भूईमुगाची तर २९६ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये २२ फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी हंगामात ६० टक्के पेरणी पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. 

अशी झाली भुईमूग पेरणीउन्हाळी हंगामामध्ये परभणी तालुुक्यात भूईमूग या पिकासाठी १ हजार १३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार १७९ हेक्टवर पेरणी झाली आहे. गंगाखेड ५३० पैकी ४५ हेक्टर क्षेत्रावर, पाथरी ५२० पैकी ८०, जिंतूर २७० पैकी ६०७, पूर्णा ७९० पैकी ७५, पालम ३५० पैकी १८, सेलू १७० पैकी ११०, सोनपेठ ५३० पैकी ३० तर मानवत तालुक्यात ५२० हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ८३२ हेक्टर क्षेत्रावर भूूईमुगाची पेरणी करण्यात आली.

उपलब्ध पाण्याचा शेतकर्‍यांना होणार फायदाजिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्वर, डिग्रस बंधारा, मुदगल, मुळी, ढालेगाव या प्रकल्पांबरोबरच जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. निम्न दुधना व जायकवाडी प्रकल्पामधून आतापर्यंत २ ते ३ पाणी पाळ्या जिल्ह्यातील पिकांसाठी सोडण्यासाठी सोडण्यात आल्या. या पाण्याचा रबी हंगामातील पिकांना चांगला फायदा झाला. यानंतर जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा उन्हाळी हंगामातील पिकांनाही लाभ होणार आहे. त्यामुळे या हंगामातही शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा आहे.

सूर्यफुलाकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठकृषी विभागाच्या वतीने यावर्षीच्या उन्हाळी हंगामामध्ये भूईमूग, मका या पिकांबरोबरच सूर्यफूल या पिकासाठी ३४० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. यासाठी परभणी तालुक्यासाठी १०० हेक्टर, गंगाखेड १०, पाथरी ४०, जिंतूर १०, पूर्णा ६०, पालम १०, सेलू १०, सोनपेठ ५० तर मानवत तालुक्यासाठी ५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु,  २२ फेब्रुवारीपर्यंत एकाही तालुक्यात शेतकर्‍यांनी सूर्यफूल पिकाची पेरणी केली नाही. त्यामुळे सूर्यफूल पिकाच्या पेरणीकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी