पत्नी सोडून गेल्याने युवकाची दारूच्या नशेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:51 IST2019-03-22T18:46:52+5:302019-03-22T18:51:12+5:30
आत्महत्येपूर्वी त्याचे पत्नीसोबत भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.

पत्नी सोडून गेल्याने युवकाची दारूच्या नशेत आत्महत्या
दैठणा (परभणी ) : दारुच्या नशेत एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० मार्च रोजी रात्री घडली. नंदू उत्तम चव्हाण असे मृताचे नाव असून त्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तसेच आत्महत्ये पूर्वी त्याचे पत्नीसोबत भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.
किशननगर तांडा येथील नंदू उत्तम चव्हाण (३०) हा २० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेपासून दारु पित होता. रात्री पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नी घरातून बाहेर निघून गेली. याचवेळी नंदू चव्हाण याने घराचा दरवाजा बंद करुन पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. २१ मार्च रोजी आत्महत्येचा हा प्रकार समोर आला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेतली.
या प्रकरणी उत्तम रामजी चव्हाण यांच्या माहितीवरुन दैठणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.