पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू; एकाला वाचविण्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 15:09 IST2021-10-04T15:09:30+5:302021-10-04T15:09:52+5:30

कौडगाव शिवारात मासोळी नदी दुथडी भरून वाहत आहे.

Drowning child who went for a swim; Success in saving one | पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू; एकाला वाचविण्यास यश

पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू; एकाला वाचविण्यास यश

गंगाखेड ( परभणी ) : तालुक्यातील कौडगाव येथील मासोळी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली असून, दुसऱ्या मुलास रेस्क्यू ऑपरेशन राबवून वाचविण्यास यश मिळाले आहे.

कौडगाव शिवारात मासोळी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदी पात्रात गावातील मुले आणि प्रौढ व्यक्तीही पोहण्यासाठी येतात. सोमवारी सकाळी सतीश अंगद जामगे (१४) आणि अभय रामदास जामगे (१५) हे दोघे नदीपात्रात पोहोण्यासाठी गेले. याच वेळी पोहोता न आल्याने सतीश अंगद जामगे याचा चक्राकार डोहात अडकून मृत्यू पावला. तर अभय जामे हा पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहत गेला. पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या अभय जामगे वाचविण्यास ग्रामस्थांना यश आले.
 

Web Title: Drowning child who went for a swim; Success in saving one