वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST2021-05-23T04:16:49+5:302021-05-23T04:16:49+5:30
जिल्ह्यातील खासगी प्रवासी वाहतूक लाॅकडाऊनने बंद आहे. तसेच ऑटो, स्कूल बस, प्रवासी वाहतुकीच्या जीप यांनाही निर्बंध घातले आहेत. यामुळे ...

वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला
जिल्ह्यातील खासगी प्रवासी वाहतूक लाॅकडाऊनने बंद आहे. तसेच ऑटो, स्कूल बस, प्रवासी वाहतुकीच्या जीप यांनाही निर्बंध घातले आहेत. यामुळे या वाहनधारकांचे उत्पन्न जवळपास बंदच आहे. सध्या शहरातील दुचाकी व चारचाकी वाहन दुरुस्तीचे गँरेज मागील दीड महिन्यापासून बंद आहेत. वाहनात साधी हवा भरायची म्हटले तरी मोठी अडचण निर्माण झाली आहे. चुकून एखाद दुसरे हवा भरण्याचे दुकान, पेट्रोलपंप परिसरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबींचा फटका वाहनचालक, नागरिक, गॅरेज दुरुस्ती आणि ऑटोमोबाइल्सचे विक्रेते यांनाही बसला आहे.
शहरातील वाहने
कार- १७३४१
जीप - ११०४५
दुचाकी - २५९१०१
रिक्षा -७३३०
ट्रक - ५९५९
रुग्णवाहिका - १५३
स्कूल बस - १३९
ट्रॅक्टर - १०९९१
मिनीबस - १६५
टूरिस्ट कँब - ३२१
वाहने सुरू, पण गॅरेज बंद
शहरातील घरोघरी किमान एक दुचाकी तर काही घरी दुचाकी, चारचाकी वाहने असतात. दररोज नोकरी, व्यवसाय तसेच किरकोळ कामासाठी नागरिक वाहने वापरतात. सध्या लाॅकडाऊनने गॅरेज बंद आहेत; परंतु वाहनांचा वापर सुरूच आहे. अशा वेळी वाहनाची दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग करण्यासाठी गॅरेजच सुरू नसल्याने गैरसोय होत आहे.
वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर
चारचाकी वाहने एकाच जागेवर धूळखात फडून असल्याने त्यांची बँटरी डिस्चार्ज होणे तसेच टायर ट्यूब खराब होण्याची शक्यता असते. यातच बाहेरगावी जाणे किंवा कुठेही जाण्यापूर्वी वाहनाची देखभाल दुरुस्ती करो गरजेचे असते. मात्र, गॅरेज बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
गॅरेजवाल्यांचे पोट-पाणी बंद
दिवसभर आलेल्या वाहनांच्या दुरुस्तीतून पैसे मिळाल्यास घरखर्च आणि दुकानाचा खर्च तसेच कर्मचारी यांचे पगार देता येतात. सध्या दोन महिने झाले एक रुपयाचे उत्पन्न नाही. शासनाची कोणताही मदतसुद्धा आम्हाला मिळालेली नाही.
- हबीब भाई, गॅरेजचालक.
शासनाने आमच्या व्यवसायाशी निगडित असलेल्या दुकानांना ठराविक वेळ निश्चित करून देत व्यवसायास परवानगी द्यावी. तरच आमचा खर्च निघू शकेल.
- शेख खदीर शेक ताहेर.
दुसऱ्या जिल्ह्यात करावी लागते सर्व्हिसिंग
परभणी येथे सर्व दुचाकी तसेच चारचाकी दुरुस्तीची गँरेज बंद आहेत. माझ्या चारचाकी वाहनाची सर्व्हिसिंग करण्यासाठी कधी कधी नांदेड किंवा औरंगाबाद येथे जाण्याची वेळ आली. दुचाकी दुरुस्ती दुकानेही बंद असल्याने गैरसोय होते.
- वीरेंद्र लाठकर,
टायर, बँटरी डिस्चार्ज
लाॅकडाऊनमध्ये बाहेर विनाकारण फिरल्यास पोलीस कारवाई करतात. तर दुसरीकडे गॅरेज बंद असल्याने किरकोळ तसेच अन्य दुरुस्ती कामे करता येत नाहीत. माझ्या चारचाकी वाहनाची बॅटरी एकाच जागेवर वाहन उभे असल्याने डिस्चार्ज झाली आहे. तसेच टायरही खराब झाले आहेत.
- परिमल लांडगे.