चालकाचे नियंत्रण सुटल्याने धोकादायक वळणार कार उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 15:59 IST2021-11-04T15:57:09+5:302021-11-04T15:59:19+5:30
पोहेटाकळी पुढे रेणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर धोकादायक वळण आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने धोकादायक वळणार कार उलटली
पाथरी : पोहे-टाकळीजवळ असणाऱ्या वळणावर आज पहाटे १ वाजेच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्डयात कोसळली. यात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. कारमधील दोन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी परभणीकडे रवाना करण्यात आले आहे.
पाथरी-पोखरणी रस्त्यावरून एक कार (क्र. एम एच 14 एच के 8554) परभणीच्या दिशेने जात होते. पोहेटाकळी पुढे रेणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे वळण आहे. या धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात कोसळली. यात कारचा पूर्ण चुराडा झाला.
पोलीस हेल्पलाईनला रात्री दीड वाजेच्या सुमारास कॉल आल्यानंतर पाथरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तत्पूर्वीच जखमींना परभणीकडे उपचारासाठी हलविण्यात आले होते. कारमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलगा असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्याच्या डायरीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.