शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अतिवृष्टी निधीचे तालुक्यांना वितरण; पात्र लाभार्थ्यांना ५० टक्के मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 2:58 PM

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील २ लाख  १५ हजार ६७५  शेतकऱ्यांच्या १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे जून ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

ठळक मुद्देसेलूला सर्वाधिक निधीशेतकऱ्यांना आता पीक विम्याची प्रतीक्षा

परभणी : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या ९० कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीपैकी ९० कोटी २० लाख ८८ हजार रुपयांचा निधी सर्व तालुक्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी तातडीने वितरित केला आहे. 

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील २ लाख  १५ हजार ६७५  शेतकऱ्यांच्या १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे जून ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला १८० कोटी रुपयांच्या  निधीची आवश्यकता होती. या संदर्भातील मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनाने जिल्ह्याला ९० कोटी ५१ लाख ३४ हजार रुपयांचा  निधी वितरित केला आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने कारवाई करीत नऊही तालुक्यांना ९० कोटी ५१ लाखांपैकी ९० कोटी २० लाख ८८ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे. 

उर्वरित निधी  याच  लेखाशिर्षातंर्गत प्रशासकीय कामकाजाच्या  अनुषंगाने वापरण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात काढलेल्या आदेशात ९० कोटी २० लाखांपैकी ६१ कोटी ३५ लाख ५९ हजार रुपयांचा निधी एसडीआरएफच्या दराने ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यासाठी वितरित केला आहे. तर २८ कोटी ८५ लाख २९ हजार रुपयांचा निधी वाढीव दराने शेती पिकांसाठी ३ हजार २०० रुपये व बहुवार्षिक  पिकांसाठी ७ हजार रुपये प्रति हेक्टर दराने मदत देण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. जि्ल्हाधिकाऱ्यांनी वितरित केलेला निधी पात्र सर्व लाभार्थ्या्च्या खात्यावर मागणीच्या  प्रमाणात ५० टक्के जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

शेतकऱ्यांना आता पीक विम्याची प्रतीक्षाअतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने ५० टक्के निधी आता वितरित केला आहे. उर्वरित ५० टक्के निधी दिवाळीनंतर वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत मिळणार आहे. याशिवात पीक विमा कंपनीकडूनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळणार आहे. जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर जमिनीवरील पीक रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे संरक्षित केले आहे. त्यामध्ये २ लाख ४० हजार ३३ हेक्टरवरील सोयाबीन तर २३ हजार ६६७ हेक्टरवरील कापूस पिकाचा समावेश आहे. याशिवाय १५ हजार १६९ हेक्टरवरील उडीद, ३९ हजार ५७२ हेक्टरवरील मूग पिकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रिलायन्स विमा कंपनीकडे ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपयांचा हप्ता भरला आहे. आता जिल्ह्यातील बहुतांश भागातील पिकांचे अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे संरक्षित केलेल्या पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. रिलायन्स विमा कंपनी ही मदत कधी वितरित करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीfundsनिधीagricultureशेती