सोनपेठ येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल जागर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 18:02 IST2018-08-27T18:01:54+5:302018-08-27T18:02:25+5:30
येथील तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागण्यासाठी आज सकाळी ढोल जागर आंदोलन करण्यात आले.

सोनपेठ येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल जागर आंदोलन
सोनपेठ (परभणी ): येथील तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागण्यासाठी आज सकाळी ढोल जागर आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी नायब तहसीलदार डॉ. निकेतन वाळे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावर दिनकर तीथे, पिंटू आळसे, अशोक मुळे, राजाभाऊ निळे, रामेश्वर आळसे, माणीक आळसे, बालाजी धोतरे, अशोक पुंजारे, शुभम डोणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.