भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:16 IST2021-04-05T04:16:03+5:302021-04-05T04:16:03+5:30
जिल्ह्यात वाढू लागली उन्हाची तीव्रता परभणी : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असून उकाड्यामुळे अंगाची लाही लाही ...

भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी
जिल्ह्यात वाढू लागली उन्हाची तीव्रता
परभणी : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असून उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहते. रात्रीच्या वेळीही वातावरणात उकाडा जाणवत आहे.
काढणीच्या कामात शेतकरी मग्न
परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिके काढणीला आली आहेत. ग्रामीण भागांमध्ये ही कामे वेगाने सुरू आहेत. गहू, ज्वारी या पिकांची काढणी सध्या सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये मजुरांची टंचाई असल्याने शेतकरी कुटुंब या कामात मग्न असल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांनी सुरू केली उन्हाळी हंगामाची तयारी
परभणी : रब्बी हंगाम जवळपास पूर्ण झाला असून, आता शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या हंगामात भूईमुगाचे पीक घेतले जाते. काही भागात बियाण्यांसाठी सोयाबीनची लागवडही करण्यात आली आहे.
पुलाच्या कामाला कंत्राटदाराकडून गती
परभणी : गंगाखेड रस्त्यावर पिंगळगड नाल्याजवळ पूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून या पुलाची दुरवस्था झाली होती. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये हा पूलही नव्याने उभारला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय दूर होण्याची आशा आहे.
वाहनधारकांची वाढली गैरसोय
परभणी : येथील अक्षदा मंगल कार्यालयासमोरील रस्ता उखडला असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या भागात काही महिन्यांपूर्वी अर्धवट रस्ता तयार करण्यात आला होता. त्यामुळे अर्ध्या भागापर्यंत रस्ता चांगला असून अर्ध्या भागात मात्र खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. सध्या या परिसरात कोरोना सेंटर सुरू केल्याने वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी गिट्टी उखडली आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. मनपाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.