कृषिपंपाची वीज तोडणी थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST2021-03-23T04:18:50+5:302021-03-23T04:18:50+5:30
वीज बिलासाठी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज तोडणी करणे, ट्रान्सफाॅर्मर बंद करणे, वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना त्रास देऊन ...

कृषिपंपाची वीज तोडणी थांबविण्याची मागणी
वीज बिलासाठी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज तोडणी करणे, ट्रान्सफाॅर्मर बंद करणे, वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना त्रास देऊन सक्तीची वसुली सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे.
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कृषिपंपाची वीज तोडणी मोहीम थांबवावी, ज्या ठिकाणी मीटर बंद आहेत,
त्या ठिकाणी मागची सरासरी काढून बिले आकारण्यात यावीत, थकीत बिलाच्या रकमेवरील व्याजाची व दंडाची रक्कम रद्द करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने महावितरण कंपनीला निवेदन सादर करण्यात आले आहे.
महावितरणच्या अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर मधुकर आवचार, संतोष आवचार, दत्ता आवचार, परमेश्वर आवचार, जनार्दन आवचार, रावण आवचार, नारायण आवचार, उद्धव आवचार, सोपान जाधव, मारोतराव आवचार, पुरुषोत्तम शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.