गंगाखेड-परभणी रस्त्यावरील तडे दुरुस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:48+5:302021-04-04T04:17:48+5:30
परभणी-गंगाखेड या राज्य महामार्गाची दुरवस्था झाल्याने अनेक संघटना व राजकीय पक्षांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलने करून पाठपुरावा केला. ...

गंगाखेड-परभणी रस्त्यावरील तडे दुरुस्त करण्याची मागणी
परभणी-गंगाखेड या राज्य महामार्गाची दुरवस्था झाल्याने अनेक संघटना व राजकीय पक्षांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलने करून पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्र शासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर या रस्त्याच्या कामास गती मिळाली. सद्यस्थितीत या रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. मात्र, परभणी तालुक्यातील उमरी फाटा ते ब्राह्मणगाव दरम्यान या रस्त्याला जागोजागी तडे गेले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तडे गेलेल्या रस्त्याचे काम नव्याने करण्याचे आदेशित करावे, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील नागरिकांतून होत आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.