सोनपेठमध्ये घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:27 IST2018-08-30T17:26:43+5:302018-08-30T17:27:59+5:30
रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभधारकांना तात्काळ सहा ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

सोनपेठमध्ये घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी
सोनपेठ (परभणी ) : रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभधारकांना तात्काळ सहा ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडीयाच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सोनपेठ तालुक्यात रमाई घरकुल आवास योजना सन 2017- 18 मध्ये 700 घरकुल मंजुर झालेले आहेत. सध्या वाळूचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे लाभार्थींचे घरकुलाचे काम झाले नाही. यामुळे लाभार्थींनी शासनाकडून योग्य तो भरणा घेऊन सहा ब्रास वाळू उपलब्ध करावी, नविन निराधार योजनेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत यासह इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
नायब तहसीलदार निकेतन वाळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी डि. एन. दाभाडे, रामभाऊ बचाटे, विठ्ठल उजगरे, भगवान वाघमारे, गौतम प्रधाने, कल्याण केदारे, वसंत केदारे, नाथराव पंचागे, सोमनाथ जोगदंड, बाबुराव रणखांबे, जयश्री पंचागे, अंकुश गायकवाड आदींची उपस्थिती होती.