दिव्यांगांच्या लसीकरणास प्राधान्य देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:43+5:302021-05-08T04:17:43+5:30
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सर्वसामान्य नागरिकांना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी मोठी ...

दिव्यांगांच्या लसीकरणास प्राधान्य देण्याची मागणी
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सर्वसामान्य नागरिकांना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. अशातच लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. अशा संकट काळात दिव्यांगांची फरपट होत आहे. त्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हाभरात दिव्यांगाना लसीकरण, तपासणी व उपचारासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे यांनी केली आहे. दिव्यांगांना सर्व शासकीय रुग्णालयात ५ टक्के बेड राखीव ठेवण्यात यावेत, असेही या निवेदनात बोधणे यांनी म्हटले आहे. निवेदनावर जिल्हा प्रमुख बोधणे यांच्यासह युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे पाटील, शहर प्रमुख पिंटू कदम, दिव्यांग आघाडी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.