आजीबाईंचा बटवा अन् कोरोनाला हटवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST2021-05-24T04:16:15+5:302021-05-24T04:16:15+5:30
शहरासह जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही जण कोरोना होऊ नये तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी जुन्या काळी ...

आजीबाईंचा बटवा अन् कोरोनाला हटवा!
शहरासह जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही जण कोरोना होऊ नये तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी जुन्या काळी आजी-आजोबा ज्या बाबींचा अवलंब साधारण ताप-सर्दी, खोकला व अन्य आजारांवर करत तेच उपाय कोरोना काळात घरोघरी केले जात आहेत. घरातील ज्येष्ठ सदस्य आजी, आजोबा यांच्या बटव्यात ठेवलेली अनेक आयुर्वेदिक औषधी यानिमित्ताने आजीबाई घरातील सदस्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी खाण्यास देत आहेत. औषधी, काढे, रस आणि ज्येष्ठमध, लवंग, तुळस यांचा वापर केला जात आहे. यातून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण - ४७८६१
कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ४३६८६
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - २१८५
कोरोना मृत्यू - ११९०
आजीबाईंच्या बटव्यात काय?
या औषधींचा फायदा
तापासाठी कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा, गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा घेणे,
सर्दीसाठी आल्याचा रस व गूळ यांची गोळी करून त्यात मिऱ्याची पूड आणि गूळ दह्यातून घेतले जात आहे.
खोकला आल्यास लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटण, जिरे व साखर खाणे आदी उपाय केले जात आहेत.
ज्यांना झोप न येण्याची तक्रार असल्यास त्यांनी तळपायात मोहरीचे तेल लावावे.
दररोज हळदीचा काढा दुधातून घेणे तर तुळस, आद्रक याचा काढा घेणे याला महत्त्व दिले जात आहे.
आयुर्वेदिक तज्ज्ञ कोट