दशक्रियाविधीसाठी आला अन् जीव गमावला; गोदावरीतील पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 18:09 IST2022-04-19T18:02:48+5:302022-04-19T18:09:55+5:30

पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून झाला मृत्यू

Death of a relative who came for Dashakriya Vidhi by drowning in Godavari pot | दशक्रियाविधीसाठी आला अन् जीव गमावला; गोदावरीतील पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

दशक्रियाविधीसाठी आला अन् जीव गमावला; गोदावरीतील पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

गंगाखेड (परभणी ) :  दैठणा येथील नात्यातील मृत व्यक्तीच्या दशक्रियाविधीसाठी आलेल्या एकाचा दुसलगाव शिवारातील गोदावरी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली. गंगाधर भिकाजी कच्छवे ( ५५, रा.कोकणगाव ता.अहमदपुर जि. लातुर ) असे मृताचे नाव आहे. 

परभणी तालुक्यातील दैठणा येथील एका मृत व्यक्तीचा दुसलगाव शिवारातील गोदावरी पात्रात आज दशक्रियाविधी आयोजित केला होता. यासाठी अहमदपूर तालुक्यातील कोकणगाव येथिल मृताचे नातेवाईक गंगाधर भिकाजी कच्छवे आले होते. दुसलगाव शिवारातील  कन्ह्केश्वरी घाटावर दशक्रियाविधी पार पडत असताना कच्छवे नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडले. 

नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर बचावकार्य सुरु केले. पोलीस पाटील संगिता कचरे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम सुरु केली. तब्बल चार तासानंतर विठ्ठल गोपीचंद भुंगासे याने कच्छवे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. 

Web Title: Death of a relative who came for Dashakriya Vidhi by drowning in Godavari pot