परभणी जिल्ह्यात नांदेडच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:35 IST2018-03-25T00:35:29+5:302018-03-25T00:35:29+5:30

Death of Nanded's boy in Parbhani district | परभणी जिल्ह्यात नांदेडच्या युवकाचा मृत्यू

परभणी जिल्ह्यात नांदेडच्या युवकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नांदेड येथील एका युवकाचा पूर्णा रेल्वे स्थानकावर चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़
पूर्णा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर हा युवक चक्कर येऊन खाली पडला आणि काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली़ जमादार ओमप्रकाश वडदकर यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली असता हा युवक नांदेड शहरातील आंबेडकर नगर येथील रहिवाशी असून, त्याचे नाव कपील अशोक गायकवाड असे असल्याचे स्पष्ट झाले़ या प्रकरणी नांदेड रेल्वे पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Death of Nanded's boy in Parbhani district