पूर्णा नदीत पोहताना चुलत भावडांचा मृत्यू; दोघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:38 IST2020-06-01T13:38:00+5:302020-06-01T13:38:52+5:30

चार भावंड पोहण्यासाठी गेली होती पूर्णा नदी पात्रात

Death of cousins while swimming in Purna river; Two survived | पूर्णा नदीत पोहताना चुलत भावडांचा मृत्यू; दोघे बचावले

पूर्णा नदीत पोहताना चुलत भावडांचा मृत्यू; दोघे बचावले

ठळक मुद्देवझर येथील चार भावंड दसेहार सणा निमित्ताने पूर्णा नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते

जिंतूर :  पूर्णा नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या दोन सख्या चुलत भावांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वझर (बू ) येथे सोमवारी (दि. १) सकाळी ८.३० वाजता घडली. यावेळी इतर दोघांना वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. ओम ज्ञानेश्वर पजई ( १८ ) व महेश भानुदास पजई ( १६ ) असे मृतांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वझर येथील चार भावंड दसेहार सणा निमित्ताने पूर्णा नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले. यावेळी नदी काठावर असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्याने काही ग्रामस्थ मदतीला धावले. आटोकाट प्रयत्नानंतर दोघांना वाचविण्यात यश आले. तर अत्यवस्थ अवस्थेत सापडलेल्या दोघांना पाण्याच्या बाहेर काढून ग्रामस्थांनी वझर येथील शासकीय रुग्णालयात नेले. येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना खाजगी वाहनाने जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून दोघानांही मृत घोषित केले. मृत दोघे सख्खे चुलत भाऊ असून एकाच परिवारावारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Web Title: Death of cousins while swimming in Purna river; Two survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.