वाळु धक्क्याची हद्द सोडून असलेले दोरखंड कापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:37+5:302021-05-31T04:14:37+5:30
महातपुरी येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाला असताना वाळू धक्का खरेदी करणाऱ्या ठेकेदाराने नदीपात्रातील वाळूचा उपसा करण्यासाठी धक्क्याची हद्द सोडून ...

वाळु धक्क्याची हद्द सोडून असलेले दोरखंड कापले
महातपुरी येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाला असताना वाळू धक्का खरेदी करणाऱ्या ठेकेदाराने नदीपात्रातील वाळूचा उपसा करण्यासाठी धक्क्याची हद्द सोडून महातपुरी ते खळी दरम्यान या कडीने त्या कडेला नदीपात्रात दोरखंड बांधत वाळूचा बेसुमार उपसा सुरू केल्याचे ३० मे रोजी दुपारी खळी शिवारात गेलेल्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, रतन सावंत, दत्तात्रय पडोळे, कृष्णा तंबूड, राजू पवार, सुनील टोले, अक्षय गादेकर आदींनी गोदावरी नदीचे काठावर जाऊन सरपंच शिवाजी पवार, पुंडलिक सुरवसे, विजय सोन्नर, बालासाहेब पवार व खळी गावातील ग्रामस्थांच्या मदतीने नदी काठावर अंदाजे दोन किलोमीटर अंतर पायी चालून बांधलेले १०० ते १५० दोरखंड कोयता व कुऱ्हाडीने तोडून फेकले आहेत.