जिल्ह्यात अवैध धंद्यांना लागेना लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:15+5:302021-04-02T04:17:15+5:30
सार्वजनिक हातपंपाचे साहित्य गायब परभणी : शहरातील विविध प्रभागांमध्ये सार्वजनिक हातपंप देण्यात आले आहेत. या हातपंपावर बसविलेले साहित्य गायब ...

जिल्ह्यात अवैध धंद्यांना लागेना लगाम
सार्वजनिक हातपंपाचे साहित्य गायब
परभणी : शहरातील विविध प्रभागांमध्ये सार्वजनिक हातपंप देण्यात आले आहेत. या हातपंपावर बसविलेले साहित्य गायब झाले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मनपाने हे हातपंप सुरू करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. हातपंपांचे साहित्य बसविल्यास प्रभागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पाणी उपलब्ध होऊ शकते. तेव्हा मनपा प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
बसपोर्टच्या कामाला सुरुवात
परभणी : येथील बसस्थानक परिसरात सहा महिन्यांपासून बंद असलेले बसपोर्टचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या कामाची मुदत संपलेली असून, महामंडळाने आता हे काम गतीने पूर्ण करून घेतल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकते.
बाजार समितीतील उलाढाल ठप्प
परभणी : रब्बी हंगामात उत्पादित मालाची मोठ्या प्रमाणात बाजार समितीच्या मार्केट यार्डात आवक होत असते. मात्र संचारबंदीमुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली आहे. मागील सात दिवसांत मार्केट यार्ड आवक झाली नसल्याने व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
दुभाजकाची लांबी वाढविण्याची मागणी
परभणी : येथील वसमत रस्त्यावरील दुभाजकाची लांबी वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. वसमत रस्त्यावरील दत्तधामपर्यंत नागरी वसाहती वाढल्या आहेत. मात्र खानापूर फाट्यापर्यंत दुभाजक टाकलेले आहे. दुभाजकाअभावी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा हे दुभाजक दत्तधामपर्यंत वाढवावे, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.