शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक प्रगती खुंटेल, शिक्षकांच्या बदली रद्द करा; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे नदीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 17:31 IST

विद्यार्थी आणि ग्रामस्थ्यांचे दूधना नदी पत्रात अर्ध जलसमाधी आंदोलन  

मानवत (परभणी) : शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी तालुक्यातील इरळद येथील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आज दूधना नदीपात्रात अर्धजल समाधी आंदोलन सुरु केले आहे. गटविकास आणि गटशिक्षणाधिकारी यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक ठाम होते. बदली रद्द बाबत  निर्णय झाल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल असा इशारा आंदोलकानी दिला आहे.

तालुक्यातील इरळद येथील जिल्ह्य परिषद शाळेत पहिली ते दहावी वर्गात 525 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षात या शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने महत्वपूर्ण बदल घडले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावल्याने शाळा नावारुपाला आली आहे. परंतु, नुकतेच 6 शिक्षकांच्या बदलीचे आदेश धडकले. शिक्षक येथून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी ग्रामस्थांची भीती आहे. यामुळे सर्व शिक्षकांची बदली रद्द करावी , अशी मागणी करत ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी आज सकाळी सकाळी 11 वाजता दुधाना नदी पात्रात अर्धजल समाधी आंदोलन सुरु केले आहे. मागणी मान्यहोईपर्यंत आंदोलन सुरु च राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, ग्रामस्थांनी यापूर्वी देखील याच मागण्यांसाठी आंदोलन केले होते.

गटविकास अधिकारी आल्या पावली परतलेगटविकास अधिकारी स्वप्नील पवार, गटशिक्षणाधिकारी डी आर रनमाळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बदलीचा निर्णय रद्द झाल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल असा पवित्रा घेतल्याने गटविकास अधिकाऱ्याना आल्या पावली परत जावे लागले.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकEducationशिक्षण