बसस्थानकात वाढली प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:17+5:302021-01-16T04:20:17+5:30

शहरातील पोलीस चौकी बंद अवस्थेत परभणी : शहरातील विविध भागात होणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौकी ...

The crowd of passengers increased at the bus stand | बसस्थानकात वाढली प्रवाशांची गर्दी

बसस्थानकात वाढली प्रवाशांची गर्दी

Next

शहरातील पोलीस चौकी बंद अवस्थेत

परभणी : शहरातील विविध भागात होणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौकी मागील काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. पोलिस चौकीमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यास बऱ्याच अंशी गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळू शकते. तेव्हा बंद असलेल्या पोलीस चौकी सुरू करणे गरजेचे झाले आहे.

जिंतूररोडवरील पुलाची दुरवस्था

परभणी : जिंतूर रस्त्यावरील जायकवाडी कालव्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलावर जागोजागी रस्ता उघडला असून वाहने चालवताना धोका निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जायकवाडी प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

पिंगळगड नाल्यावरील फुलाचे कठडे गायब

परभणी : गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावरील पुलाचे कठडे गायब झाले आहेत. सध्या या भागात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील वाहतूक धोकादायक बनली आहे. पुलाला कठडे बसविल्यास धोका कमी होऊ शकतो. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आधी पुलाचे काम पूर्ण करुन घ्यावे, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

Web Title: The crowd of passengers increased at the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.