कौसडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुडगूस; आठ जणांना चावा घेऊन केले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 18:16 IST2017-12-14T18:15:12+5:302017-12-14T18:16:54+5:30

परभणी - एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी दुपारी जिंतूर तालुक्यातील कौसडी ...

Crooked puppies; Eight people were injured by bites | कौसडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुडगूस; आठ जणांना चावा घेऊन केले जखमी

कौसडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुडगूस; आठ जणांना चावा घेऊन केले जखमी

परभणी - एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना १३ डिसेंबर रोजी दुपारी जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे घडली़ या सर्व जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत़

कौसडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने बुधवारी चांगलाच धुडघुस घातला़ पिसाळलेला कुत्रा समोर आलेल्या व्यक्तीला चावा घेऊन जखमी करीत होता़ दुपारपर्यंत या कुत्र्याने आठ जणांना चावा घेऊन जखमी केले होते़ यामध्ये सोपान शिंपले, शेख मुस्सा, जनाबाई बहीरट, मुंजाभाऊ बहीरट, अ.हकीम अ.करीम, सुरज देशमुख, ओम मोरे, बाबाराव मोरे व  एका लहान मूलाचा समावेश आहे़ यामध्ये लहान मुलास जोराचा चावा घेतल्याने या मुलास परभणी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकारामुळे ग्रामस्थ चांगलेच भयभित झाले होते़ दरम्यान, सायंकाळी कुत्रा मृत झाला होता़ त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Crooked puppies; Eight people were injured by bites