शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील गुन्हेगारांची टोळी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

टोळी प्रमुख लक्ष्मण अच्युत गायकवाड आणि टोळीतील सदस्यांनी परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वारंवार गुन्हेगारी घटना केल्या आहेत. ...

टोळी प्रमुख लक्ष्मण अच्युत गायकवाड आणि टोळीतील सदस्यांनी परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वारंवार गुन्हेगारी घटना केल्या आहेत. व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या कृतीतून दुखापत करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रानिशी गैरकायद्याच्या मंडळींचा सदस्य होऊन दंगा करणे, मारहाण करणे आदी १३ गुन्हे या सदस्यांवर दाखल आहेत. या टोळीच्या संदर्भाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवाल सादर केला असून, सदस्यांना हद्दपार करण्याची शिफारस या अहवालात केली आहे. त्यावरून दि. १८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. त्यात टोळीप्रमुख लक्ष्मण गायकवाड, सदस्य अनिल अच्युत गायकवाड यांना सहा महिन्यांसाठी, तर सुरेश रामभाऊ पवार आणि आकाश राजाभाऊ जाधव यांना तीन महिन्यासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढले आहेत. या आदेशानुसार नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी वरील आरोपींना जालना व बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे नेऊन सोडले आहे.

चार महिन्यांत १४ जणांना हद्दपार

जिल्हा पोलीस प्रशासनाने चार महिन्यांच्या कालावधीत १४ जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यात पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांची टोळी तसेच नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या टोळीतील दहा सदस्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आता चार जणांना हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. यापुढेदेखील अशा पद्धतीच्या कारवाया सुरूच राहणार आहेत. दहशत पसरविणाऱ्या व बेकायदेशीर वागणाऱ्या टोळ्यांची गैर केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिला आहे.