निकृष्ट खताचा उत्पादनाप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 07:09 PM2019-09-05T19:09:10+5:302019-09-05T19:11:10+5:30

प्रयोगशाळेच्या अहवालानुसार नमुने अप्रमाणित असल्याचे सिद्ध

Crime against manager over inferior fertilizer production | निकृष्ट खताचा उत्पादनाप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा

निकृष्ट खताचा उत्पादनाप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा

मानवत: अप्रमाणित खत विक्री केल्याप्रकरणी खत उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकाविरोधात मानवत पोलिस ठाण्यात ४ सप्टेंबर रोजी  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मानवत पं.स.कृषी विभागाच्या पथकाने ७ मे २०१९ रोजी शहरातील जानकी सिडस ॲन्ड या दुकानाची तपासणी केली होती.या दुकानात गोवा राज्यातील झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीचे सिंगल सुपर फास्फेट (दाणेदार) खत विक्री करण्यासाठी ठेवण्यात आला होता.यावेळी खताचे पथकाने नमुने घेऊन सदर नमुने औरंगाबाद येथे खत चाचणी प्रयोगशाळेत पाठविले होते.

प्रयोगशाळेच्या अहवालानुसार हे नमुने अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्याने कृषी विभागाने उत्पादक कंपनीला निकृष्ट दर्जाचे खत उत्पादन ,वितरण व विक्री केल्याप्रकरणी कारणे द्या नोटीस बजावुन खुलासा मागवला होता.या प्रकरणी कंपनीने दोन दिवसांपूर्वी केलेल्या खुलासा नसल्या कारणाने येथील पं.स.कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक सुभाष तमशेटे यांनी झुआरी कंपनीचे व्यवस्थापक गजानन जयराम कवट यांच्या विरोधात महाराष्ट्र अत्यावश्यक वस्तू अधिनियमनुसार शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Crime against manager over inferior fertilizer production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.