लॉकडाऊनला नगरसेवकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:28+5:302021-04-01T04:18:28+5:30

परभणी : कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसून, लॉडाऊन लावू नये आणि लावायचेच असेल तर एक दिवसाआड करावे, ...

Corporators oppose lockdown | लॉकडाऊनला नगरसेवकांचा विरोध

लॉकडाऊनला नगरसेवकांचा विरोध

परभणी : कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसून, लॉडाऊन लावू नये आणि लावायचेच असेल तर एक दिवसाआड करावे, अशी मागणी बहुतांश नगरसेवकांनी बुधवारी बी.रघुनाथ सभागृहात पार पडलेल्या बैठकीत केली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात ३१ मार्च रोजी सकाळी येथील बी.रघुनाथ सभागृहात महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करताना नगरसेवकांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला.

या बैठकीस आ.सुरेश वरपूडकर, आयुक्त देविदास पवार, उपमहापौर भगवान वाघमारे, उपायुक्त प्रदीप जगताप, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, नगरसचिव विकास रत्नपारखे, सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, संतोष वाघमारे, शिवाजी सरनाईक आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले, नगरसेवकांनी आपल्या प्रभागात लसीकरण तसेच आर.टी.पी.सी.आर. चाचण्या वाढविण्यासाठी जनजागृती करावी. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात ३४२ रुग्ण आढळले होते. मार्चमध्ये साडेपाच हजारांपर्यंत बाधितांची संख्या गेली आहे. शहरात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तरी आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन लस घेण्याचे आवाहन करावे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. नगरसेवक इम्रान हुसैनी, गुलमीर खान, विकास लंगोटे, अमोल पाथरीकर यांनी लॉकडाऊनला विरोध केला. नगरसेवकांनी यावेळी स्टाफची मागणी केली. त्यावर तत्काळ स्टाफ भरती करण्याचे आदेश मुगळीकर यांनी दिले.

नगरसेवकांनी सहभाग नोंदवावा : वरपूडकर

कोरोना लसीकरण मोहिमेत नगरसेवकांनी सहभाग नोंदवावा. माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवावी, असे आ.सुरेश वरपूडकर यांनी यावेळी सांगितले.तसेच चाचण्यांचे अहवल लवकर देण्याची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवकांच्या मागणीनुसार एक दिवसाआड लॉकडाऊन करण्याचेही आ.वरपूडकर यांनी यावेळी सूचित केले.

Web Title: Corporators oppose lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.