coronavirus : परभणी जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 15:53 IST2020-08-29T15:52:12+5:302020-08-29T15:53:17+5:30
जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ११८ झाली आहे.

coronavirus : परभणी जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
परभणी : जिल्ह्यात शनिवारी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची मालिका अद्यापही सुरूच आहे.
पाथरी शहरातील ८५ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याने सुरुवातीला परभणी येथे उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यास औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील एका ३५ वर्षीय रुग्णाचाही शनिवारी सकाळी परभणी येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मागच्या पंधरा दिवसांपासून मृत्यूची मालिका सुरू असून, ती शनिवारीही कायम राहिली. जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ११८ झाली आहे.