Coronavirus : धक्कादायक ! परभणीत आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:27 IST2020-07-13T11:27:07+5:302020-07-13T11:27:40+5:30

जुना पेडगाव रोड भागातील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Coronavirus: Shocking! Another corona patient dies in Parbhani | Coronavirus : धक्कादायक ! परभणीत आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

Coronavirus : धक्कादायक ! परभणीत आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या एका ४५ वर्षीय रुग्णाच्या १३ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे.

शहरातील जुना पेडगाव रोड भागातील ४५ वर्षीय व्यक्ती  कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचार घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्यावर पूर्वीपासूनच कर्करोगाच्या आजाराचे उपचार सुरू होते. दरम्यान, १३ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता सात झाली आहे. त्यात परभणी शहरातील २,सेल शहरातील ३ आणि जिंतूर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: Coronavirus: Shocking! Another corona patient dies in Parbhani