Coronavirus : परभणी जिल्ह्यात वाढले कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:21 IST2020-07-16T11:21:32+5:302020-07-16T11:21:56+5:30

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३११ झाली आहे.

Coronavirus: Nine new coronavirus patients have grown in Parbhani district | Coronavirus : परभणी जिल्ह्यात वाढले कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण

Coronavirus : परभणी जिल्ह्यात वाढले कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात आणखी नऊ रुग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संपर्क वाढत चालला आहे. नवीन वसाहतींमध्ये आता कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आरोग्य विभागाला १२ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये पाथरी तालुक्यातील ३, सेलू तालुक्यात दोन आणि परभणी तालुक्यामध्ये चार रुग्ण रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३११ झाली आहे.

Web Title: Coronavirus: Nine new coronavirus patients have grown in Parbhani district