coronavirus : परभणीत ४ बाधितांचा मृत्यृ; एकूण कोरोनाबळींची संख्या ११५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:18 PM2020-08-28T15:18:12+5:302020-08-28T15:24:16+5:30

जिल्ह्यात २ हजार ६३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

coronavirus: death of 4 patients in Parbhani; The total number of corona deaths is 115 | coronavirus : परभणीत ४ बाधितांचा मृत्यृ; एकूण कोरोनाबळींची संख्या ११५ वर

coronavirus : परभणीत ४ बाधितांचा मृत्यृ; एकूण कोरोनाबळींची संख्या ११५ वर

Next
ठळक मुद्देआतापर्यंत ९२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

परभणी:  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४ कोरोनाबाधित व्यक्तींचा गुरूवारी रात्री व शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला असून जिल्ह्यात आता एकूण मयतांची संख्या ११५ झाली आहे. 

जिंतूर येथील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने २५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरुअसताना या महिलेचा २७ आॅगस्ट रोजी रात्री १०.३६ च्या सुमारास मृत्यू झाला. तसेच परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट भागातील एका ६५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने २५ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३६ वाजता उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या महिलेचा २७ आॅगस्ट रोजी मध्यरात्री १२.०५ च्या सुमारास मृत्यू झाला. 

मानवत शहरातील एकता नगर भागातील एका ७७ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याने २७ आॅगस्ट रोजी रात्री ९.३३ वाजता उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या व्यक्तीचा २८ आॅगस्ट रोजी सकाळी ७.२० च्या सुमारास मृत्यू झाला. तसेच पालम तालुक्यातील ताजवाडी येथील एका ५५ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याने २६ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजता परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या पुरुषाचा २८ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास मृत्यू झाला. जिल्ह्यात आता एकूण मयतांची संख्या ११५ झाली असून २ हजार ६३१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ९२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या : 

- अंबाजोगाईत कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून

- बीड जिल्ह्यात ३० वर्षीय महिलेवर बलात्कार

Web Title: coronavirus: death of 4 patients in Parbhani; The total number of corona deaths is 115

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.