Coronavirus : परभणी जिल्ह्यात ७ कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 08:55 IST2020-07-15T08:54:25+5:302020-07-15T08:55:24+5:30

जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे

Coronavirus : Addition of 7 corona victims in Parbhani district | Coronavirus : परभणी जिल्ह्यात ७ कोरोनाबाधितांची भर

Coronavirus : परभणी जिल्ह्यात ७ कोरोनाबाधितांची भर

परभणी : जिल्ह्यात आणखी ७कोरोनाबधितांची वाढ झाली असून त्यामध्ये ६ जण परभणी शहरातील आहेत. 

जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभरात ८ रुग्णाची वाढ झाली होती. त्यानंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालात आणखी ७ रुग्णाची भर पडली. त्यामध्ये परभणी शहरातील सरफराज नगर, वडगल्ली, नानलपेठ, काद्राबाद प्लॉट, आणि बस स्थानकाजवळील खाजगी दवाखाना येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एक रुग्ण गंगाखेड शहरातील आहे.

जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता २९७ झाली आहे. त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला असून १३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १५३ जणांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Coronavirus : Addition of 7 corona victims in Parbhani district