coronavirus : परभणी जिल्ह्यात ६८ बाधितांची वाढ; तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 19:50 IST2020-08-27T19:49:20+5:302020-08-27T19:50:44+5:30
जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ६३१ झाली आहे

coronavirus : परभणी जिल्ह्यात ६८ बाधितांची वाढ; तिघांचा मृत्यू
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, गुरुवारी ६८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. परभणी शहरात २०, तालुक्यात ४, गंगाखेड तालुक्यात ७, मानवत शहरात ३, जिंतूर तालुक्यात २७, पाथरी तालुक्यात ४ आणि सेलू शहरात २ रुग्ण आढळले आहेत. पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील ४५ वर्षीय पुरुष, गंगाखेड शहरातील राजेंद्रपेठ येथील ७६ वर्षीय वृद्ध आणि जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ६७ वर्षांचा वृद्ध या तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ६३१ झाली असून, ९२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ३२ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.